टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE Pune ) दहावीच्या निकाला संदर्भात (SSC Result) पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद माहिती देण्यात आली. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 15 लाख 60 हजार 154 नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी, 15 लाख 49 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला आहे. 25770 रिपीटर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 25327 परीक्षेला बसले होते.तर 12958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील 38 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला. तर, शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 9382 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी दिली जाणार आहे. दहावीच्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं बोर्डाच्यावतीनं शरद गोसावी यांनी अभिनंदन केलं. दहावीची परीक्षा सहा विषयांसाठी घेण्यात येते. त्यापैकी बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीनं टक्केवारी जाहीर करण्यात येते. दरवर्षी प्रमाणेच यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे. जे विद्यार्थी पुनर्परीक्षेला पात्र ठरलेत त्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.

राज्यातील 38 शाळांचा निकाल शुन्य टक्के
राज्यातील नऊ विभागांमध्ये शुन्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 38 आहे. पुणे विभाग 6, नागपूर विभाग 5, छत्रपती संभाजीनगर विभाग 5, मुंबई विभाग 5, कोल्हापूर विभाग 1, अमरावती विभाग 7, नाशिक विभाग 3, लातूर विभाग 6 कोकण विभागात एकाही शाळेचा निकाल शुन्य टक्के लागला नाही.
राज्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 9382 इतकी आहे. यामध्ये पुणे विभाग 1542, नागपूर विभाग 1007, छत्रपती संभाजीनगर विभाग 840, मुंबई विभाग 1533, कोल्हापूर विभाग 1270, अमरावती विभाग 1063, नाशिक विभाग 1006, लातूर विभाग 608, कोकण विभाग 513
23288 शाळांची नोंदणी, शंभर टक्के शाळा 40.29 टक्के, शुन्य टक्के निकाल शाळा 0.16 टक्के आहेत. राज्यातील 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. अतिरिक्त गुण घेऊन त्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. प्रश्न पत्रिका सोडवून एकाला ही 100 टक्के गुण मिळालेले नाहीत, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली.
दहावीचा निकाल या वेबसाईटवर जाहीर होणार
https://mahresult.nic.in/
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org










