news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राज्य दुष्काळाच्या छायेत ! महाराष्ट्रावर मोठे जलसंकट ; राज्यातील मंत्री परदेशी पर्यटनात तर काही देवदर्शनात व्यस्त, दुष्काळाच्या बैठकीलाही अनेक पालकमंत्र्यांची दांडी  

टीम लोकमन by टीम लोकमन
May 27, 2024
in ताज्या घडामोडी
0
राज्य दुष्काळाच्या छायेत ! महाराष्ट्रावर मोठे जलसंकट ; राज्यातील मंत्री परदेशी पर्यटनात तर काही देवदर्शनात व्यस्त, दुष्काळाच्या बैठकीलाही अनेक पालकमंत्र्यांची दांडी   

टीम लोकमन मंगळवेढा |

एकीकडे दुष्काळाच्या झळांनी लोकांचे हाल होत आहेत, आणि दुसरीकडे दुष्काळाच्याच बैठकीला ८ पैकी ५ पालकमंत्री दांडी मारत आहेत. काही परदेशात आहेत, काही परदेशाला जाण्याच्या तयारीत, तर काही मंत्री देवदर्शनाला रवाना झाले आहेत.

नांदेडच्या मुखेडमध्ये पाणीटंचाईनं चाऱ्याचा तुटवडा झालाय. परिणामी दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय. तर कुठे दोन हंडे  पाणी मिळण्यासाठी ३-३ तास वाट पाहावी लागतेय. लातूरात पाणी टंचाईमुळे अधिकारी लोकांमध्ये संघर्ष होतोय. आधीच दुष्काळ, त्यात तापमान 43 वर, पुन्हा त्यात १२ तास लाईट गायब झाल्यानं संभाजीनगरमध्ये लोकांचा संताप उसळून येत आहे.

जलाशय आटल्यामुळे त्याचा फटका मच्छिमारांना बसतोय. सुखना धरणाच्या मृतसाठ्यावर हजारो पक्षी आश्रयाला आले आहेत. सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पक्षी याच भागात तळ ठोकून आहेत. दुसरीकडे मोसंबीच्या बागा जळाल्यामुळे जेसीबी लावून बागा उद्धवस्त कराव्या लागत आहेत. परभणीतल्या एका गावची लोकसंख्या १२ हजार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची मदार एकाच विहिरीवर आहे.

दुष्काळानं बीडची ऐतिहासिक खजाना बावडीही आटलीय. लातूरच्या अहमदपूरमधला 12 गावांना पाणी देणाऱ्या मोघा तलावानं ३२ वर्षानंतर तळ गाठलाय. पश्चिम विदर्भात केवळ 29.73 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी टंचाई बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात जाणवतेय. पुरंदर तालुक्यातलं नाझरे धरण आटलंय. धरणात पाण्याचा एक टिपूस देखील नाही. नाशिकच्या गंगापूर धरणानं तळ गाठायला सुरुवात केलीय. फक्त 25 टक्के जलसाठा उरलाय. धुळ्यातील डेडरगाव तलावात फक्त २० दिवस पुरेल इतकं पाणी उरले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची दांडी

मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांची ऐनवेळेस बैठक बोलावली. बुधवारी २२ तारखेला रात्री साडे ११ वाजता एसएमएसद्वारे बैठकीचे निरोप देण्यात आले. मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीत मराठवाड्याचे 8 पैकी तब्बल 5 पालकमंत्री गैरहजर राहिले. धक्कादायक म्हणजे दुष्काळाच्या बैठकीला बीडचे पालकमंत्री आणि खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडेंच गैरहजर होते. माजी कृषीमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार गैरहजर. ज्या जिल्ह्यात बैठक झाली, त्याच संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे गैरहजर. त्यांच्या गैरहजेरीमागे आजारपणाचे कारण सांगितले जात आहे. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे गैरहजर, आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे देखील गैरहजर होते.

हिंगोली जिल्ह्यात ११ लाख लोकांना दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेशवारीला गेले आहेत. चर्चेनुसार कृषीमंत्री धनंजय मुंडेंही परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय बनसोडे देखील देवदर्शनाला गेले होते. बैठकीला हजर असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंत, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची हजेरी होती.

शहरात १० मिनिटात ऑनलाईन ऑर्डर केल्यावर पाण्याचा जार उपलब्ध होतो. मात्र गावात पाण्यामुळे अर्थकारणाचं चक्र बिघडतं. पाणी नाही तर चारा नाही. चारा नाही तर दूध नाही, आणि दूध नाही तर इतर व्यवसायही मंद होतात. शिवाय आपलं पशूधन जगवणं हे दुष्काळातलं शेतकऱ्यापुढचं सर्वात मोठं आव्हान बनतं.

Previous Post

‘खेकड्या’ ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय ; पुण्यातील घटनेवरून आमदार रोहित पवार यांचा निशाणा

Next Post

दहावीच्या निकालात राज्यातील 38 शाळांना भोपळा तर 9382 शाळांचा शंभर टक्के निकाल ; निकालात कोकण विभागाची सरशी, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Next Post
मोठी बातमी ! अखेर प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल ‘या दिवशी’ जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा

दहावीच्या निकालात राज्यातील 38 शाळांना भोपळा तर 9382 शाळांचा शंभर टक्के निकाल ; निकालात कोकण विभागाची सरशी, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group