टीम लोकमन मंगळवेढा |
अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक व रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी यांनी कृष्णनगर मंगळवेढा येथील स्व.संजय सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयास टेक्स्ट कंपनीची लॅमिनेशन मशीन भेट दिली.
सदरचे लॅमिनेशन मशीन अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या ज्येष्ठ संचालिका सौ.अनुराधा रत्नपारखी, संचालिका सौ.श्रद्धा रत्नपारखी, व्यवस्थापकीय संचालक अमोल रत्नपारखी यांनी वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्त केले.
या मशीनमुळे वाचनालयातील महत्त्वाची कात्रणे, दस्तावेज, प्रमाणपत्रे ,भारतीय व परदेशी पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह व चलनी नोटांचा संग्रह दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येणार असल्याने राकेश गायकवाड यांनी रत्नपारखी कुटुंबाचे आभार मानले. यावेळी अर्चना महामुनी, विजय क्षीरसागर, मनोज घुले, रोहिणी शिंदे, मयुरी मेहरकर, वैशाली गायकवाड, राजकुमार वेदपाठक, विठ्ठल महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.











