टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा शहरातील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे यांचेहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पुष्पांजली शिंदे म्हणाल्या, बुद्ध पौर्णिमा हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या आरोग्य मित्र सपना धनवे, रूपाली कुंभार, प्रवीण पवार, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे, गुरुनाथ शिवशरण, डॉ. प्रथमेश बाबर, सिद्धार्थ सर्वगोड, शशिकांत काळे, सुजित सरवदे, मुराद इनामदार, आशाताई पाटोळे, राणी इंगळे, अर्पिता भोरकडे, मयुरी क्षीरसागर, धनश्री बनसोडे, साक्षी पुजारी यांचेसह हॉस्पिटल मधील स्टाफ व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.










