news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

‘त्या’ मुलाच्या त्रासामुळेच माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली ; पुण्यातील अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या ‘पत्नीने’ केलेल्या आरोपाने खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
May 22, 2024
in ताज्या घडामोडी
0
‘त्या’ मुलाच्या त्रासामुळेच माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली ; पुण्यातील अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या ‘पत्नीने’ केलेल्या आरोपाने खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली. मात्र या घटनेनंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेने घेतलेल्या अनाकलनीय भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पुण्यासह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

या सगळ्या घडामोडींनंतर आता ब्रह्मा कॉर्पचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि कुटुंबाविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेने असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे.

अपघात प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा याविषयी भाष्य करत कठोर कारवाईची हमी दिली आहे. पोलीस आयुक्तांशी माझे बोलणे झाले. संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

बारावी बोर्ड परीक्षेत मरवडे येथील हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या यशाची परंपरा कायम ; कला व विज्ञान शाखेत मुलीचं ठरल्या अव्वल, ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

स्वर्गीय विठ्ठलराव नारायणराव येलपले पाटील जुनिअर कॉलेज येड्रावची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा अखंडित ; प्रशालेचा एकूण निकाल 98.96 टक्के

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group