टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार दिनांक 20 मे रोजी महाराष्ट्र राज्यातील तेरा मतदारसंघासह देशातील 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदार संघात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. यामध्ये अक्षय कुमार, जान्हवी कपूर यांचेपासून ते प्रशांत दामलेंपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सध्या सोशल मीडियावर राजधानी मुंबईमधील काही मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेक हिंदी चित्रपटसृष्टी व मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, फरहान अख्तर, जोया अख्तर, जान्हवी कपूर, प्रशांत दामले, शोभा खोटे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान आज लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज पाचवा टप्पा आणि महाराष्ट्र राज्यातील अखेरचा टप्पा पार पडत आहे. राज्यातील अखेरच्या टप्प्यात मुंबईमधील 6 मतदारसंघासह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी व धुळे अशा राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. राज्यातील 264 व देशभरातील 695 उमेदवारांचे नशीब आज ईव्हीएम मशीन मध्ये सीलबंद होणार आहे.












