news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जत तालुक्यात दुष्काळाचे गंभीर रूप, जलस्त्रोत आटले, जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई : असह्य परिस्थितीने बेजार झालेले नागरिक जिवंतपणी भोगत आहेत मरणयातना ; निर्ढावलेल्या प्रशासनाला पाझर फुटणार का?

जतमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष ; भाजपा नेते तम्मनगौडा रवीपाटील यांची टीका

टीम लोकमन by टीम लोकमन
May 19, 2024
in ताज्या घडामोडी
0
जत तालुक्यात दुष्काळाचे गंभीर रूप, जलस्त्रोत आटले, जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई : असह्य परिस्थितीने बेजार झालेले नागरिक जिवंतपणी भोगत आहेत मरणयातना ; निर्ढावलेल्या प्रशासनाला पाझर फुटणार का?

माडग्याळ : नेताजी खरात

जत तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई व चारटंचाई आहे. जनावरे व नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वेळ नाही, अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तम्मनगौडा रवीपाटील यांनी केली.

रवीपाटील म्हणाले की, सध्या जत तालुक्यातील 78 गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे. सध्या पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे टँकर भरणे कठीण झाले आहे. पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत. अपूरा पाणीपुरवठा केला जात आहे. वाड्या वस्तीवरील जनता व जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत.

जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा अत्यंत भीषण प्रश्न आहे. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता. दोन महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून जाहीर केले होते. मात्र तीन महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो, चारा अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आमदारांनाही या प्रश्नाचे गांभीर्य नाही असे दिसत आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर व जनावरांच्या चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत.

जत तालुक्याच्या शेतकऱ्यांचा दूध हा प्रमुख व्यवसाय आहे. घरटी जर्सी जनावरांचे पालन केले जाते. पाणी व चाऱ्याअभावी दूध व्यवसाय धोक्यात आला आहे. हे अस्मानी संकट टाळण्यासाठी तातडीने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.अनेक गावातील द्राक्षबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. कृषी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे फिरकायलाही तयार नाहीत. प्रशासनावर आमदारांचा अंकुश नसल्याने दुष्काळी परिस्थितीत मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र जत तालुक्यात पाहायला मिळत आहे.

जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आपण अनेक गावांचा दौरा केला. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री यांना भेटून मानसी ४० लिटर पाणी वाढवून घेतले आहे‌. चाऱ्याचा विषयही त्यांच्याकडे मांडला होता. मात्र त्यानंतर आमदारांनी या विषयावर एकदाही संबंधित विभाग व अधिकाऱ्यांशी समन्वय साधला नाही. राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची आवर्तने तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार आहे. म्हैसाळ योजनेतून दोड्डा नाल्यापर्यंत पाणी सोडले तर किमान टँकर पाणी भरण्यासाठी सोय होऊ शकते. त्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही तमनगौडा रवीपाटील यांनी सांगितले.

Previous Post

मातोश्री सौ. काशीबाई घुले स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

Next Post

मोठी बातमी ! शरद पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार? ; पवारांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

Next Post
लोकसभा निवडणूक ! धैर्यशील मोहिते पाटलांसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची शुक्रवारी सांगोल्यात प्रचार सभा

मोठी बातमी ! शरद पवारांचे सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार? ; पवारांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group