आंधळगाव : गणेश पाटील
पंचायत समिती मंगळवेढा येथे कार्यरत असलेले तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सुहास सलगर यांनी मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी येथील ध्येय क्रांती वाचनालयास खुर्च्या व स्टूल भेट दिले आहेत.
ध्येय क्रांती वाचनालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन डॉ. सुहास सलगर यांनी ही मदत केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून ग्रामीण विद्यार्थ्यांचा ओढा स्पर्धा परीक्षेकडे वाढताना दिसत आहे. पण दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव जाणवत आहे. आणि हीच गरज लक्षात घेऊन डॉ. सुहास सलगर यांनी या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन हातभार लावला आहे. तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केल्यास तालुक्यात अधिकाऱ्यांची संख्या वाढण्यास निश्चितच मदत होईल.











