नांदेड : उज्वला गुरसुडकर
मालेगाव येथील रुचिता कैलास वाघ या विद्यार्थिनीने MBBS परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. नाभिक समाजांतील या कन्येने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
रुचिताचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालेगाव शहरातील रुक्मिणीबाई झुंबरलाल काकाणी विद्यालय येथे झाले. रुचिताने इयत्ता दहावीला ९४% गुण मिळवून प्रथम श्रेणी मिळवली होती.तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला होता. नाशिक येथील आर.वाय.के कॉलेज मध्ये बारावी सायन्स केल्यानंतर रुचिताने डहाणू येथील वेदांत मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेवून एमबीबीएस प्रतीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केले. सध्या यांचं कॉलेज मध्ये इटर्नशिप करत आहे.
रुचिता ही मालेगाव शहरांतील रहिवासी कै. विठ्ठलराव फकीरा वाघ (कंडक्टर) व श्रीमती ठगूबाई विठ्ठलराव वाघ यांची नात असून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत असलेले कैलास विठ्ठलराव वाघ यांची कन्या व मधुकरराव विठ्ठलराव वाघ यांची पुतणी आहे. कैलास वाघ व सौ.संगिता वाघ यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. रुचितानेही आपल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करून वैद्यकीय क्षेत्रांतील MBBS ही उच्च पदवी मिळवून मालेगाव शहरांत नाभिक समाजांतील पहिली महिला डॉक्टर कोणाचा मान मिळवला आहे. वाघ परिवार तसेच मालेगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाजासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
डॉ. रुचिता कैलास वाघ यांच्या यशाबद्दल मालेगाव शहरातील नाभिक समाज संघटनांनी, नाभिक टायगर सेना, मालेगाव तसेच नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रांतील नाभीक समाज बांधव व बहुजन समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे. रुचिताला पुढील शिक्षणाची वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.









