टीम लोकमन मंगळवेढा |
आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेकडे पाहिले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्याची असलेली हीच परंपरा जतन करण्यासाठी मंगळवेढ्यातील अमोल रत्नपारखी ज्वेलर्सने अक्षयतृतीया शुभमुहूर्त ऑफर्स ठेवल्या आहेत.
या ऑफर्स मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरीमध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्के पर्यंत सवलत मिळणार आहे. चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर २० टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. ही सवलत ऑफर फक्त अक्षयतृतीया शुभ मुहूर्तासाठी शुक्रवार दिनांक १० मे या एकाच दिवशी लागू असणार आहे. अशी माहिती अमोल रत्नपारखी ज्वेलर्सचे संचालक अमोल रत्नपारखी यांनी दिली.
भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेला सोने खरेदीची असलेली परंपरा जोपासण्यासाठी ग्राहकांनी अमोल रत्नपारखी ज्वेलर्सला प्राधान्य द्यावे. अमोल रत्नपारखी ज्वेलर्सने गुणवत्ता शुद्धता आणि ग्राहक सेवेच्या बळावर ग्राहकांच्या मनात घर केले असून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे मंगळवेढा तालुका व परिसरातील ग्राहकांचा ओढा सोने खरेदीसाठी अमोल रत्नपारखी ज्वेलर्सकडे असल्याचे दिसत आहे.
अमोल रत्नपारखी ज्वेलर्स ही पेढी एक विश्वासार्ह सुवर्णपेढी म्हणून मंगळवेढा परिसरात नावारुपास आली आहे. १२३ वर्षांपूर्वी सुरू झालेली ग्राहक सेवेची परंपरा अखंडितपणे कार्यरत आहे. रत्नपारखींची चौथी पिढी या सुवर्ण पेढीचे सारथ्य करीत आहे. या पेढीचे संचालक अमोल रत्नपारखी व श्रद्धा रत्नपारखी यांनी ग्राहक सेवेमध्ये आधुनिकता आणली असून व्यवसायाचा विस्तार देखील वाढवला आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी अमोल रत्नपारखी ज्वेलर्सला भेट द्यावी असे आवाहन संचालक सौ. श्रद्धा रत्नपारखी यांनी केले आहे.










