बोराळे : राजकुमार धनवे
बोराळे ता. मंगळवेढा येथील महादेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व परमपूज्य मनोहर माधव कवचाळे सर प्रतिष्ठानच्या नूतन वस्तूचा उद्घाटन समारंभ व पतसंस्थेचा स्थलांतर सोहळा शनिवार दिनांक ११ मे रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव मनोहर कवचाळे यांनी दिली.
शनिवार दिनांक ११ मे रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम बोराळे ता. मंगळवेढा येथे संपन्न होणार आहे. संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्था सोलापूरचे अध्यक्ष ए.जी. कुंभार सर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगरचे माजी चेअरमन भगीरथ भालके, धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, तद्देवाडी मठाचे श्री वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे सर यांचेहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाइस चेअरमन तानाजी खरात, मंगळवेढ्याचे सहाय्यक निबंधक डी.एस. भवर, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांत बुगडे, सुवर्णरत्न बँकेचे संस्थापक महादेव बिराजदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव चौगुले, धनलक्ष्मी पतसंस्था अरळीचे संस्थापक भीमाशंकर पुजारी, बळीराजा पतसंस्थेचे संस्थापक दामोदर देशमुख, प्रगतशील बागायतदार शिवशंकर भांजे, गुरुबसव शिक्षण संस्था संखचे अध्यक्ष आर. के. पाटील सर, ऑडिटर मधुकर भडगे, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत साळे, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेंद्र माळी सर, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज बालाजी नगरचे प्राचार्य गणपती पवार, वीरशैव पतसंस्थेचे चेअरमन शैलेश हावनाळे, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन पंडित पाटील, नागनाथ रामगोंडा पाटील, नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळेचे अध्यक्ष भीमराव विठ्ठल पाटील, बोराळेच्या सरपंच सुजाता विनोद पाटील, दामाजी साखर कारखान्याचे संचालक दयानंद सोनगे, लक्ष्मी महिला पतसंस्था अरळीचे चेअरमन मल्लिकार्जुन सोमगोंडे, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश भांजे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर काकणकी, प्रगतशील बागायतदार आनंदा येनपे, मंगळवेढा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अजित जगताप, सलगर हायस्कूलचे अध्यक्ष विठ्ठल बिराजदार, उद्योगपती वैभव नागणे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व बसवराज पाटील, कट्टे उद्योग समूहाचे प्रमुख संजय कट्टे सर, बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष बसवराज बगले, नंदुरचे माजी सरपंच श्रीमंत म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परमपूज्य मनोहर माधव कवचाळे सर प्रतिष्ठान व महादेवी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यासाठी बोराळे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक डॉ. विलास महादेव कवचाळे, शांताराम महादेव कवचाळे, राहुल सुभाष कवचाळे, परमपूज्य मनोहर कवचाळे सर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव मनोहर कवचाळे, महादेवी महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ. जयश्री संजीव कवचाळे, पतसंस्थेचे व्यवस्थापक मल्लिकार्जुन महादेव चौगुले, संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि कवचाळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.











