टीम लोकमन मरवडे |
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मरवडे ता. मंगळवेढा येथील रहिवासी व माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव ता. मंगळवेढा येथे कार्यरत असलेले प्रा.अंकुश रामचंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनिष काळजे यांचेहस्ते प्रा. अंकुश गायकवाड यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उद्योजक अजयकुमार करंडे, संजय भगवान रणदिवे, स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ, प्रा. किशोर घुले, प्रा.गंगाधर पडणुरे,प्रा.गोरक्ष जाधव, प्रा.भालचंद्र काटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रा.अंकुश गायकवाड यांची स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबददल राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, संस्थेचे सचिव अभिजीत ढोबळे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल ढोबळे, क्रांतीताई ढोबळे, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज येड्रावचे प्राचार्य विश्वंभर काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी सरपंच दादासाहेब पवार, उद्योजक महादेव पवार-पटणे, प्राचार्य राजेंद्र पोतदार, प्राचार्य चिदानंद माळी, माजी प्राचार्य अंबादास पवार, मंगळवेढा पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी माणिक पवार, निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अतुल निकम, शिवाजी पवार, उद्योजक दत्तात्रय गणपाटील, युवक नेते संदीप सूर्यवंशी, सुनील गायकवाड सर, युवा नेते धन्यकुमार पाटील श्रीकांत गणपाटील यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











