टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल,मंगळवेढा प्रशाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते म्हणूनच या प्रशालेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत.
इयत्ता पाचवी मध्ये प्रणिती चिदानंद स्वामी, मल्लिकार्जुन चिदानंद स्वामी, आराध्या सचिन पवार, ऋचा महेश आलिगावे, आराध्या नितीन पाटील, प्रज्योत भीमराव पवार, व्यंकटेश नंदकुमार शिंदे, पृथ्वीराज योगेश फुगारे, साजिरी नितीन आसबे, रघुवीर केशव शिंदे, आदर्श दिगंबर दवले, रिया सुभाष बाबर, वैभव सुनील कदम, मधुरा मारुती गायकवाड, अनन्या अनिल इंगळे, दिव्यरत्न महादेव उबाळे, वेदांत अभिजीत भोसकर, सोहम धोंडीराम जाधव तसेच इयत्ता आठवी मध्ये अंजली भीमाशंकर साखरे, रोशनी सुनील राजगुरू, प्रांजल भीमराव पवार, वेदांतिका संदेश पाटील, वृक्षांजली विशाल गेजगे इत्यादी विद्यार्थी पात्र झाले आहेत. पाचवीला १८ विद्यार्थी व आठवीला ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये पात्र झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांबरोबरच शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. प्रशाले कडून मंथन स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे यासाठी खास तासिकांचे नियोजन करण्यात आले होते. त्याचा परिणाम वरील विद्यार्थ्यांच्या यशातून दिसून आला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











