टीम लोकमन सोलापूर |
सोलापुर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना संभाजी ब्रिगेडने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभ खेडेकर यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
सोलापूर लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी उरला असून महायुती आणि महाविकास आघाडी कडून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरवले जात आहेत. सोलापूर लोकसभेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची निवडणूक होत आहे. त्यामुळे दोन्हीकडून प्रचारात जोर लावला जात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याचा ओघ वाढतच असून आज संभाजी ब्रिगेडने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याने प्रणिती शिंदे यांची ताकद वाढली आहे. संभाजी ब्रिगेडच्या निर्णयामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य वाढणार आहे.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, मनोजकुमार गायकवाड (सहसंघटक संभाजी ब्रिगेड), दिनेश जगदाळे (राज्य कार्यकारिणी सदस्य), किरणराज घाडगे (विभागीय अध्यक्ष,पुणे विभाग), सोमनाथ राऊत (सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), प्रकाश ननवरे (सोलापूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड), कृष्णात पवार (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड), दयानंद काजले (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), अजय सोमदले (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), मनोज गंगणे (अक्कलकोट तालुका अध्यक्ष), सुरेश कदम (अक्कलकोट शहर अध्यक्ष), अभिजित भोसले (मोहोळ तालुका अध्यक्ष), विष्णू मुळे (उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष), मनोज महाडिक (दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष), आनंद काशीद (बार्शी तालुका अध्यक्ष), ललित धावणे, सचिन चव्हाण, नितीन मोहित, सोमनाथ निंबाळकर, नितीन चव्हाण, किसन गायकवाड यांचेसह संभाजी ब्रिगेडचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











