टीम लोकमन उमरगा |
रोटरी क्लब उमरगा यांचेवतीने जिल्हा परिषद शाळा उमरगा येथे मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी महिलांसाठी योगा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
योग पंचकर्म व आयुर्वेद द्वारे स्त्रियांच्या जीवनात आनंद आणणारी आनंदयात्री डॉ. राहत शेख, नॅचरोपॅथिस्ट यांनी आजपर्यंत अनेक स्त्रियांवर उपचार करून अनेक रोगापासून महिलांना मुक्त करून आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या औसा येथे शतायुषी आरोग्य केंद्र व योगा केंद्र चालवतात. उमरगा तालुक्यातील गुंजोटी या ठिकाणी हे केंद्र चालू आहे. उमरगा तालुक्यातील महिलांना योगा आणि पंचक्रमाद्वारे रोगमुक्त करण्यासाठी त्यांचे रोटरी क्लबच्या वतीने मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. यावेळी बोलताना महिलांनी योग्यवेळी आपल्या शरीराची काळजी घ्यावी व योगाचा आधार घेतला तर स्त्रिया रोगापासून दूर राहतील. तसेच योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असे मत डॉ. राहत शेख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पद्माकर मोरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर भोसले, सचिव शिवकुमार दळवी, प्रकल्प प्रमुख पुष्पलता पांढरे, रोटरी ॲन्स लता भोसले, रोटरी ॲन्स सविता दळवी, प्राचार्य शिवानंद दळगडे, सरिता उपासे, ॲन्स वंदना मेनकुदळे यांचेसह रोटरी क्लब उमरगाचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.










