टीम लोकमन सांगोला |
इंदिरा IVF सेंटर व आनंद मल्टीकेअर हॉस्पिटल सांगोला यांचे वतीने बुधवार दिनांक १ मे रोजी वंध्यत्वावर मोफत सल्ला व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती आनंद मल्टीकेअर हॉस्पिटलचे ज्येष्ठ संचालक डॉ. शिवराज भोसले यांनी दिली.
बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हे शिबिर आनंद हॉस्पिटल भोपळे रोड बसस्टॅन्ड समोर सांगोला जि. सोलापूर येथे होणार असून या शिबिरामध्ये इंदिरा IVF सेंटरचे तज्ञ डॉ. अनिल हुलसुरकर हे तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची संख्या शून्य असणे, वॉसोलिगेशन, दुर्बळ दर्जा, लो स्पर्म मोटीलिटी, फेलोपिअन ट्यूब्स ब्लॉक असणे, PCOS/ मासिक पाळीतील अनियमितता, बीजांचे अकाली रप्चर होणे, एंडोमेट्रीओसिस/ एंडोनोमायोसिस, बीज निर्मितीत समस्या असणे, यूट्रस फायबॉईडस या समस्या असणाऱ्या जोडप्यांनी संपर्क करून तपासणीसाठी यावे.
या वंध्यत्वावर मोफत सल्ला शिबिराचा जास्तीत जास्त गरजू जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आनंद मल्टीकेअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. अमर शेंडे, डॉ. सचिन लिगाडे, डॉ. स्नेहल भोसले, डॉ. विजयसिंह भोसले, डॉ. प्राची भोसले, डॉ. अमृता लिगाडे यांनी केले आहे.









