नांदेड : उज्वला गुरसुडकर
पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयांतील साहित्यिक कवी प्रोफेसर डॉ.घ.ना.पांचाळ यांच्या ” खंडीभर कविता ” या काव्यसंग्रहाला नुकताच अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळांचा “साहित्य भूषण पुरस्कार” घोषीत झाला आहे.
या पुरस्कारांसाठी साहित्य मंडळांच्या वतीने आवाहन करण्यात आले होतें. मंडळांच्या तज्ञ निवड समितीने डॉ.घ.ना.पांचाळ यांच्या ” खंडीभर कविता ” या काव्यसंग्रहाची साहित्य भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार ठाणे तेथे ८ जून २०२४ रोजी राज्यस्तरीय साहित्य मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व साहित्य प्रेमींनी त्यांचें अभिनंदन मोठ्या संख्येने केले आहे. प्रोफेसर डॉ.घ.ना.पांचाळ
एम.ए.,एम.लिब.,एम.फील.,पीएच.डी. असून माधवराव पाटील महाविद्यालय पालम येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील प्रदेश जनसंपर्क अधिकार मराठी साहित्य मंडळ, व जिल्हाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ नांदेड त्यांच्या कडे अशी अनेक पदें आहेत.
७ ग्रंथांचे संपादन तसेच साहित्य क्षेत्रांतील योगदानाबद्दल जागतिक संविधान व संसद संघाचा २०२२ चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार महापुरुषांचे वाचन वेड ‘ या ग्रंथास मराठी साहित्य मंडळाचा साहित्य भूषण पुरस्कार. कवी संमेलन व अनेक वेगवेगळ्य कार्यक्रमांचे अध्यक्षपदासाठी त्यांची निवड झालेली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे संशोधन मार्गदर्शक कुलगुरू प्रतिनिधी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिसंवाद कार्यशाळा व कवी संमेलन वैचारिक लेख या साठी ही त्यांचा सहभाग आहे.








