टीम लोकमन विजयपूर |
विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावात रथोत्सवादरम्यान दुर्घटना घडली असून यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
गावचे आराध्य दैवत श्री सिद्धलिंग महाराजांच्या कमरी मठाच्या जत्रेत ही दुर्घटना घडली. श्री सिद्धलिंग महाराजांचा रथोत्सव आज संपन्न झाला. हजारो लोक सहभागी झाले होते. जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत रथाचे चाक अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बंडू कटकदोंड वय ३५ आणि सोबू शिंदे वय ५५ यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींचे नाव आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेची नोंद इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








