टीम लोकमन सोलापूर |
गुरूकूल परंपरा जपल्यास आपल्या देशातील डॉक्टर इतर देशांमधील डॉक्टरांच्याही पुढे जातील. त्याचबरोबर मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नवीन इमारतीत मेट्रोसिटी प्रमाणेच जागतिक दर्जाचे उपचार देखील भविष्यात उपलब्ध होतील असे मत पुणे येथील नामवंत लेप्रोस्कोपिक रोबोटिक सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर शहरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, मार्कंडेय सहकारी रुग्णालयाची नवीन इमारत अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक अशा पद्धतीने निर्माण केली आहे विस्तारित इमारतीची उभारणी अतिशय अभिमानास्पद केली आहे. या नवीन इमारतीमुळे रुग्णांची सोय होणार असून या विस्तारामुळे सोलापुरातील रुग्णांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा या रुग्णालयात मिळतील यात शंका नाही. अनेक अडचणींवर मात करत ही नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. मार्कंडेय रुग्णालयात जागतिक दर्जाची रुग्णसेवा लवकरच सुरू होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कोणतेही हॉस्पिटल हे चांगल्या इमारतीवर चालत नाही तर ते उत्तम डॉक्टरांवर चालते. उत्तम डॉक्टरांची हॉस्पिटलसाठी गरज असते. मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाची इमारत उत्तम असून येथे नामांकित डॉक्टरही उपलब्ध आहेत. या जोरावरच हे हॉस्पिटल भविष्यात जागतिक दर्जाचे बनावे. मार्कंडेय रुग्णालयातील डॉक्टरांनी गरीब रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊन रुग्णालयाचा व आपला नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षाही डॉ. पुणतांबेकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ येमूल होते. माजी खासदार व रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष गंगाधरपंत कुचन, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. विजयकुमार अरकाल, व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम, संचालक आनंद चंदनशिवे, डॉ.माणिक गुर्रम, पदमशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
मार्कंडेय रुग्णालयाचे अध्यक्ष सत्यनारायण बोल्ली म्हणाले, या रुग्णालयाच्या उभारणीत गंगाधरपंत कुचन, रामकृष्णपंत बेत, ईरय्या बोल्ली, सि.म.आडम, मल्लय्या पुल्ली, सिद्रामप्पा चिप्पा, डॉ. वळसंगकर या सर्वांचा मोठा वाटा आहे. या रुग्णालयाला वीजेचा एक्सप्रेस फीडर, नर्सिंग कॉलेज मिळवून देण्याचे काम माझ्या पुढाकारातून झाले. सर्व घटकांच्या उत्तम सहकार्यामुळे रुग्णालयाचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. भविष्यात शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ गरीब व गरजू रुग्णांना मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
कार्यक्रमास संचालक डॉ. माणिक गुर्रम, डॉ. सुदीप संभारम, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, रमेश विडप, माधवी चिट्याल, सुधाकर गुंडेली, आनंद चंदनशिवे, श्रीधर बोल्ली, डॉ. भारत मुळे, डॉ. संपत बलदवा, डॉ.लता पाटील, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन यांचेसह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉ.विजयकुमार अरकाल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.लता मिठ्ठाकोल-पाटील यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम यांनी मानले.









