news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

उद्या मंगळवेढ्यात सुर्यकांत जाधव गुरुजींचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

टीम लोकमन by टीम लोकमन
April 22, 2024
in शैक्षणिक
0
उद्या मंगळवेढ्यात सुर्यकांत जाधव गुरुजींचा सेवापूर्ती सत्कार समारंभ

टीम लोकमन मंगळवेढा |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळा ढवळस ता. मंगळवेढा या प्रशालेचे मुख्याध्यापक सुर्यकांत बापूराव जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सुर्यकांत जाधव गुरुजी सेवापूर्ती सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सुर्यकांत बापूराव जाधव हे सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने शिक्षक समिती मंगळवेढा व तालुका परिवाराच्या वतीने त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय, पंढरपूर-सोलापूर बायपास रोड, मंगळवेढा येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सूर्यकांत जाधव गुरुजी हे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ढवळस ता. मंगळवेढा येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवा कालावधीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे तालुक्यामध्ये पाहिले जाते. शांत, संयमी व कर्तव्यदक्ष असलेल्या जाधव गुरुजींनी ज्या ज्या शाळेमध्ये काम केले त्या शाळेचा कायापालट झाल्याचे पहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी ज्या शाळांमध्ये कर्तव्य बजावले तिथे त्यांनी अतिशय निष्ठेने आणि उत्साहाने कार्यरत राहिल्याने ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.

सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांचे शुभहस्ते व मंगळवेढा पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी हणमंत कोष्टी यांचे अध्यक्षतेखाली हा सेवापूर्ती सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे, मरवडे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, मंगळवेढा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिकार्जुन आनंदपुरे उपस्थित राहणार आहेत.

सुर्यकांत बापूराव जाधव यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभासाठी मंगळवेढा तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जाधव परिवार, मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक समिती व तालुका परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

शाब्बास पोरांनो ! उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेतील विद्यार्थ्यांचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

Next Post

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत नगरपालिका शाळा नंबर १ चे यश

Next Post
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत नगरपालिका शाळा नंबर १ चे यश

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत नगरपालिका शाळा नंबर १ चे यश

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group