टीम लोकमन सोलापूर |
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दिनांक ५ मे २०२४ रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले होते. पंरतु महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार ५ मे रोजी होणारी नियोजित राष्ट्रीय लोकअदालत रद्द होऊन त्याचे आयोजन २७ जुलै २०२४ रोजी करण्यात येणार असल्याचे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी यांनी कळविले आहे.








