नांदेड : उज्वला गुरसुडकर
वधू दिव्या व वर प्रशांत यांच्यासह घेतली व-हाडी मंडळींनी मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे अनोखा उपक्रम घेण्यात आला. चंद्रकला व शरद सैंदाणे यांची सुकन्या दिव्या व संगिताताई रमेशराव वारूडे यांचे सुपुत्र प्रशांत यांचा विवाह समारंभ एका अनोख्या उपक्रमाची साक्ष देवून गेला.

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. जिथे प्रत्येक अठरा वर्षावरील नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्वाची भूमिका असते.आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. मतदार त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणूकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरूपात सहकार्य लाभावे .मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.हीच अपेक्षा नंदुरबार येथील स्वातंत्र्यसैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिरातील मुख्याध्यापिका मिनाक्षी पंकज भदाणे यांनी लग्नकार्यात जमलेल्या दोन हजार व्यक्तींना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी वधू दिव्या व वर प्रशांत यांच्यासह जमलेल्या दोन हजार व-हाडी मंडळींनी उभे राहून, उजवा हात पुढे करून. मिनाक्षी भदाणे यांनी एक एक ओळ बोलून आपल्या मागून सर्व वऱ्हाडी मंडळी कडून प्रतिज्ञा वदवून घेतली. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी , मतदान जागृतीसाठी प्रतिज्ञा करण्यात आली.
सगेसोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट, शेजारी यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करू अशी शपथ घेण्यात आली.यावेळी नागेशकुमार पाडवी, आमशादादा पाडवी, जितेंद्र पाडवी, कीर्तीकुमार पाडवी,अनिल जाधव, हरचंद सोनवणे ,प्रभाकर उगले, कीर्तीकुमार पाडवी ,हंसाबेन पाडवी, जसपालसिंग वळवी, कालिदास कोठावदे, किशोर हिरे, पंकज भदाणे नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष,संतोष पाडवी, छगन भदाणे,किशोर सोनवणे , कैलास खोंडे, पौर्णिमा खोंडे ,रेखा महाले,लालसिंग नाईक ,जगन शिंदे ,एल एम पाडवी, राजाराम निकम आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या उपक्रमाचे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, शिक्षणाधिकारी सतिश चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.







