टीम लोकमन मंगळवेढा |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा केल्या जातात. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अविनाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे होते.
याप्रसंगी अविनाश शिंदे, डॉ. नंदकुमार शिंदे, भारत शिंदे, मनीष बसंतवाणी, धनश्री बनसोडे, सोमनाथ हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी यांचेवतीने उपस्थिताना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, युवा नेते संतोष कोळसे, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ हेगडे, प्रवीण पवार, मयुरी क्षीरसागर, धनश्री बनसोडे, साक्षी पुजारी, गुरुनाथ शिवशरण, आकाश डांगे, शशिकांत काळे, सत्यजित सोनवले, गणेश कोरे, नितीन घाटुळे, ब्रह्मा शिंदे, राज शिंदे, बल्ला शिंदे यांचेसह संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट उपस्थित होते.








