news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

खुशखबर ! शनिवारी बोराळे येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी करणार गरजू रुग्णांची मोफत तपासणी

टीम लोकमन by टीम लोकमन
April 11, 2024
in सामाजिक
0
खुशखबर ! शनिवारी बोराळे येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने बोराळे ता. मंगळवेढा येथे शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. पुष्पांजली शिंदे यांनी दिली.
शनिवारी सकाळी १० ते २ यावेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे याठिकाणी होणाऱ्या या शिबीरामध्ये मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. वारंवार धाप लागणे, छातीत दुखणे, पायऱ्या चढताना दम लागणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबीरामध्ये येऊन तपासणी करून घ्यावी.
या शिबीरामध्ये रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

नामांकित अशा नागपूर येथील एम्स हॉस्पिटल मधील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. मनीष बसंतवाणी यांनी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे रुजू झाल्यापासून अनेक हार्ट ॲटॅक आलेल्या रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. अल्पावधीतच ते मंगळवेढा परिसरात लोकप्रिय झाले आहेत. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल अशा रुग्णांच्या छातीत दुखत असेल तर त्यांनी या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी कारण अशा रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते.

१३ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे येथे सकाळी १० ते २ यावेळेत होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, या शिबिराचे समन्वयक संतोष कोळसे यांनी केले आहे.

Previous Post

सुवर्णसंधी ! मंगळवेढ्यातील या नामांकित शोरूम मध्ये नोकर भरती सुरू

Next Post

भाजपा उमेदवार राम सातपुतेंना सोलापूर जिल्हा सेवा संघाचा पाठिंबा

Next Post
भाजपा उमेदवार राम सातपुतेंना सोलापूर जिल्हा सेवा संघाचा पाठिंबा

भाजपा उमेदवार राम सातपुतेंना सोलापूर जिल्हा सेवा संघाचा पाठिंबा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group