सोलापूर : सुरज राऊत
काल गुढीपाडव्यानिमित्त जुळे सोलापुरातील जलाराम नगर येथे राहणारे डॉक्टर नयना सुरेश व्यवहारे व त्यांच्या कन्या युक्ता सुरेश व्यवहारे यांनी अनोखी अशी उष्माघात प्रतिबंधक वनस्पती गुढी उभी केली होती यामध्ये खजूर, कैरी, कोकम, बिल्व, लिंबू, ऊस, वाळा, केळी, सारीवा, पत्री, खडीसाखर या सर्व वनस्पती उष्माघातामध्ये उपयोगी पडतात याबद्दलची सर्व माहिती आणि त्या सर्व वनस्पतींची आगळीवेगळी गुढी उभारली होती या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डॉक्टर सुरेश व्यवहारे रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष आहेत तर डॉ. सौ. नयना व्यवहारे या रोटरी क्लब जुळे सोलापूरच्या विद्यमान संचालिका आहेत. हे दाम्पत्य सातत्याने वेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असते. सामाजिक कार्यातही या उभयतांचा नेहमीच हिरीरीने सहभाग असतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी मंगळवेढा रोडवरील माऊली लँडमार्क येथे रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या वतीने अतिशय देखण्या व नयनरम्य अशा सरीवर सरी या कार्यक्रमाचे नियोजनही डॉ. नयना व्यवहारे यांनी अतिशय नेटके केले होते. या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.








