news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची रविवारी 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ; सभासदांना प्रश्न मांडण्यासाठी मिळणार हक्काचे व्यासपीठ

टीम लोकमन by टीम लोकमन
September 14, 2024
in ताज्या घडामोडी
0
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची रविवारी 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ; सभासदांना प्रश्न मांडण्यासाठी मिळणार हक्काचे व्यासपीठ

टीम लोकमन मंगळवेढा |

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 या आर्थिक वर्षाची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे विद्यमान कार्यतत्पर चेअरमन शिवानंद यशवंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.

सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्वीकारणे, ताळेबंद व नफा तोटा पत्रके स्वीकारणे व त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरीक्षक यांचेकडून आलेला लेखापरीक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, संचालक मंडळांनी सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व त्यास मान्यता देणे, आर्थिक वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या जमाखर्चास मंजुरी देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे,

पुढील वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणुका करणे, कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे, सहवीज निर्मिती प्रकल्प तसेच आसवानी प्रकल्पाची (डिस्टिलरी) उभारणी करणे, आर्थिक वर्षातील अनावश्यक भंगार माल विक्रीस मान्यता देणे व माननीय अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सूचनांचा विचार करणे. इत्यादी विषयांवर रविवारी होणाऱ्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत विचार विनिमय होणार आहे.

मंगळवेढा तालुक्यामध्ये सहकारी तत्त्वावर सुरु असलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या 36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.

यावेळी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवनसिद्ध लिगाडे सर, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, निर्मला तानाजी काकडे, लता सुरेश कोळेकर यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

तामदर्डी येथे भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी राज्य शासनाकडून 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे

Next Post

30 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकल नाभिक समाजाचे एक दिवशीय महाधरणे आंदोलन ; राज्यभरातून हजारोंच्या संख्येने नाभिक समाजबांधव सहभागी होणार !

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group